Photos : भारत-पाकिस्तानशिवाय तालिबानकडूनही कोहिनूरची मागणी, जाणून घ्या या हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास
कोहिनूर हिऱ्यावर केवळ भारतानेच नाही तर पाकिस्तान आणि तालिबानने देखील दावा केलाय. त्याचं कारण जाणून घेण्यासाठी या हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्यावा लागेल.
1 / 7
जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा म्हणजे कोहिनूर हिरा. सध्या तो ब्रिटेनच्या टॉवर ऑफ लंडनच्या ज्वेल हाऊसमध्ये आहे.
2 / 7
या प्रसिद्ध हिऱ्यावर केवळ भारतानेच नाही तर पाकिस्तान आणि तालिबानने देखील दावा केलाय. त्याचं कारण जाणून घेण्यासाठी या हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्यावा लागेल.
3 / 7
कोहिनूर हिरा अनेकांच्या हातील लागला, तर अनेकांच्या हातातून निसटला. इंग्रजांना 1849 मध्ये हा हिरा मिळाला (Is Kohinoor Diamond in British Museum). त्यानंतर या हिऱ्याची मागणी वारंवार होत आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच या हिऱ्याची मागणी केली होती.
4 / 7
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधानमंत्री जुल्फिकार भुट्टो यांनी देखील 1976 मध्ये ब्रिटिश पंतप्रधानांना पत्र लिहून कोहिनूर हिरा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी तालिबानने नोव्हेंबर 2000 मध्ये म्हटलं की कोहिनूर अफगाणिस्तानची संपत्ती आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तानला परत द्यावा. (Why is Kohinoor Diamond so Famous).
5 / 7
2002 मध्ये क्वीन मदरचं निधन झाल्यानंतर हा हिरा त्यांच्या समाधीवर ठेवण्यात आला. मात्र, त्याला ब्रिटनमधील शिखांनी विरोध केला.
6 / 7
कोहिनुर हिरा कुणाकुणाकडे होता याच्या अनेक कथा आहेत. कोहिनूर हिरा तुर्कांनी दक्षिण भारतातील एका मंदिरातील मूर्तीच्या डोळ्यातून काढल्याचं सांगितलं जातं. या हिऱ्याचा पहिला उल्लेख 1750 मध्ये होतो. फारसी इतिहासकार मोहम्मद मारवीने म्हटलं की नादिरशाहाने रक्तपात करत दिल्लीतून हा हिरा इराणला लुटून नेला.
7 / 7
नंतर तो नादिरशाहकडून अफगाणी अंगरक्षक अहमद शाह अब्दालीकडे (Kohinoor Diamond Original Place) त्याच्याकडून 1813 मध्ये महाराज रणजीत सिंहकडे आणि शेवटी ब्रिटिशांकडे आला.