थंडीत पिऊ नका नारळपाणी, अन्यथा होईल नुकसान

| Updated on: Dec 16, 2022 | 5:19 PM

1 / 5
शहाळ्याचे पाणी किंवा नारळपाणी हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर पदार्थांपैकी एक आहे. असे म्हणतात की एक ग्लास नारळपाणी हे साध्या पाण्याच्या अनेक ग्लासेसप्रमाणे असते. पण थंडीच्या दिवसात हे पाणी प्यावे की नाही याबाबत लोकांच्या मनात कायम संभ्रम असतो. त्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया.

2 / 5
सर्दी- खोकला : थंडीच्या दिवसात सकाळ-संध्याकाळ नारळपाणी प्यायल्यास सर्दी किंवा खोकला होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, नारळपाणी हे थंड प्रकृतीचे असते त्यामुळे ते दुपारच्या वेळीच प्यावे.

3 / 5
रक्तदाब : थंडीच्या वेळी रक्तदाब अधिक प्रभावित होतो आणि अशा वेळी अशा रुग्णांनी नारळपाणी पिऊ नये. खरंतर, नारळाच्या पाण्यात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत आणि गरजेपेक्षा जास्त पाण्यामुळे रक्तदाबही कमी होऊ शकतो.

4 / 5
वारंवार लघवी लागणे : हिवाळ्याच्या दिवसांत नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्यास वारंवार लघवी लागण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फक्त दुपारी एक ग्लास नारळ पाणी प्यावे.

5 / 5
 लूज मोशन: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी हानिकारकच असतो. त्याचप्रमाणे नारळ पाणी पिण्यानेही नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात नारळाचे पाणी प्यायल्यास लूज मोशन्स होऊ शकतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यास अशी परिस्थिती उद्भवते.