आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते कच्ची हळद

| Updated on: Jan 25, 2023 | 7:53 AM

हळदीमध्ये अनेक पोषक घटक असतात. कच्ची हळदही अतिशय गुणकारी असून त्याचे अनेक फायदे असतात.

1 / 5
भारतीय स्वयंपाकघरात हळदीचा वापर प्रामुख्याने होत असतो. हळद ही अत्यंत गुणकारी असून त्यातील गुणधर्मांमुळे केवळ अन्नपदार्थ शिजवतानाच नव्हे तर औषधं म्हणून आणि सौंदर्य प्रसाधनांमध्येही हळदीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे कच्ची हळदही अतिशय फायदेशीर असून त्याचेही अनेक उपयोग आहेत.

2 / 5
कच्च्या हळदीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही कच्ची हळद मदत करते.

3 / 5
  कच्च्या हळदीच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. सौंदर्य प्रसाधनांमध्येही हळदीचा वापर केला जातो.

4 / 5
 कुठे लागले अथवा जखम झाली तर तेथे कच्च्या हळदीचा लेप लावल्यास जखम लवकर भरते.  कच्च्या हळदीच्या सेवनाने इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून आराम मिळतो.

5 / 5
 कच्ची हळद ही मधुमेहाच्या आजारात अतिशय फायदेशीर ठरते. कच्ची हळद खाल्ल्याने यकृतही स्वस्थ राहण्यास मदत होते.   कच्ची हळद एकंदरच आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.