दही आणि गूळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याने अनेक फायदे मिळतात. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात,जे पचनसंस्था स्वस्थ ठेवतात. त्याशिवाय त्यामध्ये कॅल्शिअमही असते. तर गूळ हा ऋतूमानानुसार येणाऱ्या अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करतो. दही व गूळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
गुळात भरपूर लोह असते. दह्यात गूळ मिसळून खाल्याने शरीरात ॲनिमिया होत नाही. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.
दही व गुळाचे सेवन केल्याने पोट चांगले राहते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवत नाही. हे पोट फुगण्यापासून आराम देण्याचे काम करते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.
दह्यात गूळ मिसळून त्याचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पीरियड क्रॅम्प्समध्ये महिला दही व गूळ मिसळून खाऊ शकतात. यामुळे पोटात येणारे क्रॅम्प कमी होतात.
कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, बरेच लोक खूप लवकर हंगामी आजारांना बळी पडतात. अशावेळी दही आणि गुळाचे सेवन केल्याने या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.