भारतात बहुतांश घरात गव्हाच्या पीठापासून तयार केलेली पोळी खाल्ली जाते. मात्र गव्हाच्या पीठाऐवजी ज्वारी, बाजरी, मक्का आणि नाचणी यांचे सेवन केल्यास दुप्पट फायदा मिळतो.
आपले पोट निरोगी ठेवण्यासाठी फायबरचे सेवन आवश्यक ठरते. मल्टीग्रेनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोषक तत्वांचे प्रमाण अधिक असते. पोट निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारामध्ये अनेक धान्यांचा समावेश करा. काही लोक त्यात तांदळाचाही समावेश करतात.
त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. दररोज मल्टीग्रेनचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर राहतात.
आहारात मल्टिग्रेनचा नियमित समावेश केल्याने शरीर ॲक्टिव्ह राहते आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.
तसेच ही धान्यं आपल्या हाडांसाठीही फायदेशीर आहेत, कारण त्यात प्रथिने, कॅल्शिअम यांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. लहान मुले आणि वृद्धांनी मल्टीग्रेन पीठापासून बनलेल्या पदार्थांचे अवश्य सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.