QWERTY फॉरमॅटमध्ये का असतात की-बोर्डची बटणे ? कोण होता त्याचा शोधकर्ता, जाणून घ्या
कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपच्या की-बोर्डवरील बटणे अल्फाबेटिकली न लिहीता QWERTY फॉरमॅटमध्ये का असतात, ते समजून घेऊया
-
-
आजकाल बहुसंख्य लोक कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपवर काम करत असतात. पण त्या की-बोर्डची बटणे अल्फाबेटिकली नसतात तर ती QWERTY फॉरमॅटमध्ये असतात. या कीज (Key) अशा का असतात हे माहीत आहे का ? याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेऊया.
-
-
तुमच्या लक्षात आले असेल की कीबोर्डवरील अक्षरांचा क्रम हा थेट ABCD क्रमाने होत नाही तर QWERTY मध्ये असतो. QWERTY हा सर्वात जास्त वापरला जाणारा कीबोर्ड लेआउट आहे.
-
-
ख्रिस्टोफर लॅथम शोल्स यांनी 1873 मध्ये QWERTY कीबोर्डचा शोध लावला होता. टायपिंगचा वेग सुधारेल आणि टाइपरायटरवरील की (Key)जाम होण्यापासून रोखेल असा कीबोर्ड तयार करण्याचा प्रयत्न ख्रिस्टोफर करत होते.
-
-
लोकांसाठी टायपिंग सोपे व्हावे तसेच टायपिस्टना पटकन आणि सहज अक्षरे शोधता यावीत, हे QWERTY लेआउट तयार करण्याचे आणखी एक कारण होते.
-
-
कालांतराने, QWERTY कीबोर्ड लेआउट मुख्यतः टाइपरायटरवर वापरला जाऊ लागला आणि नंतर कॉम्प्युटर कीबोर्डसाठी देखील स्वीकारला गेला.
-
-
टायपिंगचा वेग कमी करण्यासाठी QWERTY लेआउटवर टीकाही केली गेली. परंतु असे असूनही, हा लेआउट आजपर्यंतचा सर्वाधिक वापरला जाणारा कीबोर्ड लेआउट आहे.