जगभरातील बहुतांश लोकांना चहा प्यायला खूप आवडतो. सकाळ असो वा संध्याकाळ, लोक चहा पिणे कधीच चुकवत नाहीत. भारतातही अनेक चहाप्रेमी आहेत. 64 टक्के भारतीयांना चहा प्यायला आवडतो. तर, यापैकी 30% लोकांना संध्याकाळचा चहा घेण्यास जास्त आवडते. पण संध्याकाळच्या चहामुळे काही विपरीत परिणामही होऊ शकतात.
संध्याकाळी दुधाचा चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. संध्याकाळच्या चहाचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चांगली झोप येण्यासाठी, झोपण्याच्या 10 तास आधी कॅफीन घेतल्यास उत्तम ठरते. पण ज्या लोकांना झोपेचे विकार आहेत किंवा तणाव आहे त्यांनी संध्याकाळी चहा पिऊ नये.
त्याशिवाय ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे, ज्यांना गॅसेसचा त्रास आहे असे रुग्ण, ऑटो इम्यून आजारांचा सामना करणारे पेशंट्स तसेच ज्यांना हेल्दी स्किनची चिंता सतावते, अशा व्यक्तींनीही संध्याकाळी चहा पिऊ नये.
संध्याकाळी दुधाचा चहा पिण्याऐवजी लोक सुका मेवा खाऊ शकतात, असा सल्ला तज्ज्ञ देतात. पण जर तुम्ही चहाचे जास्त शौकीन असाल तर दिवसातून फक्त एक कप चहा प्यावा.