पोटॅशिअमची कमतरता ठरू शकते जीवघेणी
पोटॅशिअम हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे किंवा ते जास्त झाल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. पोटॅशिअमची कमतरता कोणत्या पदार्थांच्या सेवनाने दूर करता येते, ते जाणून घेऊया.
1 / 5
पोटॅशिअम हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयाच्या गतीवर प्रभाव पडतो.
2 / 5
पोटॅशिअम हे अत्यंत आवश्यक खनिज असून ते शरीरातील द्रव पदार्थ नियंत्रित करणे , स्नायूंचे आणि नसांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. पोटॅशिअमच्या कमतरतेमुळे रक्तदाबावर परिणाम होतो आणि हृदयाच्या गतीवर प्रभाव पडू शकतो
3 / 5
पोटॅशिअमची कमतरता आणि जास्त पोटॅशिअम हे दोन्ही घातक आहे. त्यावर वेळेवर उपचार न झाल्यास हृदय पंप करणे बंद होऊ शकते, जे अतिशय धोकादायक ठरू शकते.
4 / 5
रताळ्यामधून मुबलक प्रमाणात पोटॅशिअम मिळू शकते. त्यामध्ये प्रोटीन व फायबर असते.
5 / 5
केळं हेही पोटॅशिअमचा सर्वात चांगला स्त्रोत असतो. दिवसभरात 2-3केळी खाल्याने दैनिक गरज पूर्ण होऊ शकते.