sahitya sammelan 2022 : राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनासाठी मालेगावात कुसुमाग्रज नगरी सज्ज
महेश घोलप |
Updated on: Apr 15, 2022 | 3:36 PM
मालेगावात आई प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. एकदिवसीय साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने झाली आहे. या संमेलनातील ग्रंथदिंडीत विविध लोककलांचे दर्शन, वाचन संस्कृतीवर पथनाट्य,भारूड,लेझीम,सांभळ नृत्य वेशभूषा असं आकर्षण आहे.
1 / 6
मालेगावात आई प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. एकदिवसीय साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने झाली आहे. या संमेलनातील ग्रंथदिंडीत विविध लोककलांचे दर्शन, वाचन संस्कृतीवर पथनाट्य,भारूड,लेझीम,सांभळ नृत्य वेशभूषा असं आकर्षण आहे. अनेक शाळा, संस्था समेलनात सहभागी झाल्या आहेत. कॅम्प वाचनालय ते संमेलन स्थळ अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली.
2 / 6
अनेकांच्या लोकसहभागातून संमेलन भरत आहे. संमेलनाध्यक्ष विनोदी साहित्यिक डॉ संजय कळमकर आहेत. संमेलनाचे उदघाटन कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सकाळी साडेनऊला तर स्वागताध्यक्ष संजय फतनानी यांनी केले. कॅम्प भागातील स्टार क्लब ग्राऊंडवर कुसुमाग्रज साहित्य नगरीत भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्याचे सगळे नियोजन हे राजेंद्र दिघे यांच्याकडे आहे.
3 / 6
या संमेलनातील ग्रंथदिंडीत विविध लोककलांचे दर्शन, वाचन संस्कृतीवर पथनाट्य,भारूड वेशभूषा असे आकर्षण असुन अनेक शाळा, संस्था सहभागी झाल्या आहेत. कॅम्प वाचनालय ते संमेलन स्थळ अशी ग्रंथदिंडी निघाली.
4 / 6
मालेगावात तब्बल बावीस वर्षांच्या कालावधीनंतर साहित्याचा उत्सव होणार आहे. वेगवेगळ्या पाच सत्रात हे संमेलन भरणार आहे. सकाळी साडेसातला ग्रंथदिंडीने सुरूवात झाली.या वेळी प्रमुख अतिथी खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार डॉ.सुधीर तांबे, मविप्रचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, मामकोचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, जिल्हा बॅंकेचे संचालक अद्वय हिरे, कॉंग्रेसचे नेते प्रसाद हिरे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मनपा गटनेते सुनील गायकवाड, बलुतेदार मित्र मंडळाचे अध्यक्ष बंडुकाका बच्छाव,बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, सभापती सुवर्णा देसाई, उपसभापती सरला शेळके,सुनील देवरे, शिल्पा देशमुख, धर्मा भामरे,ज्योती भोसले उपस्थित राहणार आहेत.
5 / 6
या सभामंडपास वैजिनाथराव देशमुख नाव देण्यात आले आहे. विविध वाड्मयीन पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. डॉ पी.विठ्ठल(नांदेड) यांच्या अध्यक्षतेखाली ' बदलते ग्राम व कृषीजीवन आणि मराठी कविता' या विषयावर परिसंवादात प्रा.डॉ.कैलास अंभुरे,प्रा.विदया सुर्वे- बोरसे आदी वक्ते सहभागी होतील. चित्रकार,लेखक सरदार जाधव यांची प्रकट मुलाखत तिसऱ्या सत्रात डॉ संजय बोरूडे व डॉ विनोद गोरवाडकर घेणार आहेत.
6 / 6
सुप्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात राज्यातील मान्यवर कवी आमंत्रित केले आहेत. सुत्रसंचालन रवींद्र मालुंजकर व राजेंद्र उगले करणार आहेत. सुप्रसिद्ध कवी कमलाकर देसले यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्रातील कवींचे कवी संमेलन होणार असून प्रा. माधवी पोफळे व संतोष कांबळे सुत्रसंचालन करतील. आई प्रतिष्ठानचे सचिव गिरीश सुर्यवंशी, कार्यवाह सुमित बच्छाव, डॉ.एस.के.पाटील,के.एन.अहिरे, निंबा निकम, नचिकेत कोळपकर,कार्याध्यक्ष प्रविण शिंदे, शिवदास निकम,जगदीश कांबळे, भुषण सोनवणे,निवृत्ती सावंत, जितेंद्र सावंत, निलेश नहिरे, वैजनाथ भारती, वाल्मिक घरटे, लता सूर्यवंशी पदाधिकारी व विविध संस्था पुढाकार घेत आहेत.