चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार, कियारा आडवाणी आणि या सिनेमातील सर्व कलाकार 'द कपिल शर्मा शो' च्या सेटवर झळकणार आहे.
कपिलनं या शोमध्ये अक्षयसह सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत धमाल केली आहे.
तर कियारानं शोमध्ये लॉकडाऊनचा अनुभव शेअर केला. लॉकडाऊनच्या काळात आपण लाडू बनवायचा प्रयत्न केल्याचं तिनं सांगितलं.
मात्र लाडू बनवताना ते कुकिज बनले असल्याचं कियारानं सांगितलं. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. शिवाय स्वत: कुकिज बनवून कियारानं सेटवर सगळ्यांसाठीसुद्धा आणले होते.