हिंदू धर्मात लाल चंदनाचा वापर पूजेदरम्यान गंध म्हणून केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही लाल चंदनाने अनेक प्रकारचे उपाय देखील करू शकता. हे जीवनातील अनेक संकटं दूर करण्याचे काम करतात.
सुख-समृद्धी मिळवण्यासाठी - शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करा. शुक्रवारी लाल चंदनाचा टिका लावावी. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. सुख-समृद्धी मिळविण्यासाठी दर शुक्रवारी कपाळावर लाल चंदनाचा टिळा लावावा.
जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी - माँ कालीच्या सिद्ध मंत्रांचा लाल चंदनाच्या माळाने जप करा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. यामुळे जीवनात आनंद येतो.
धनलाभासाठी - कधी कधी खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. अशा वेळी लाल कपड्यात लाल गुलाबाची फुले, लाल चंदन बांधून ठेवा. दर 6 महिन्यांनी बदलत रहा. असे केल्याने धनप्राप्ती होते.
व्यवसायात प्रगती करण्यासाठी - मंगळवारी लाल चंदनाने पीपळाच्या 11 स्वच्छ पानांवर राम लिहा. या पानांची माळ बनवा. ही माळ हनुमानाला अर्पण करा. असे केल्याने व्यवसायात प्रगती होऊ शकते.(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)