Landslide in Manipur : मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात भूस्खलन 7 जवानांसह 14 जणांचा मृत्यू ; बचावकार्य सुरुच
भूस्खलन घडलेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मात्र खराब हवामान व पावसामुळे बचाव कार्यात अडथळा ठरत आहेत. ढिगाऱ्या खाली अडकलेली नागरिक व जवानां काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
1 / 8
देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुराचीपरिस्थिती उद्भवली आहे.मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली आहे. इम्फाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. त्याच ठिकाणी भूस्खलन झाले आहे.
2 / 8
या घटनेत सात जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये जवानाचाही समावेश आहे.
3 / 8
भूस्खलन घडलेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मात्र खराब हवामान व पावसामुळे बचाव कार्यात अडथळा ठरत आहेत. ढिगाऱ्या खाली अडकलेली नागरिक व जवानां काढण्यासाठी प्रशासनाचेशर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
4 / 8
भारतीय लष्करान दिलेल्या माहितीनुसार नोनी जिल्ह्यातील तुपल रेल्वे स्टेशनजवळ जोरदार भूस्खलनाचा फटका बसला. घटनेच्या वेळी तिथे बांधकामाधीन मणिपूर-जिरिबाम रेल्वे मार्गाचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी तैनात असलेले सैनिक उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली.
5 / 8
बचाव कार्य सुरु आहे, आम्ही कठोर परिश्रम करत आहोत पण पाऊस आणि इतर खराब हवामानुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तुलुम स्टेशन आहे जिथे ट्रेन थांबायची होती. अशी माहिती डीजीपी पी डोंगेल यांनी दिली आहे.
6 / 8
भूस्खलन झालेल्या ढिगाऱ्याखालूनआतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अजूनही शोध सुरू आहे. या घटनेत किती लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत याची नेमकी माहिती नाही.
7 / 8
बचाव कार्य सुरु आहे, आम्ही कठोर परिश्रम करत आहोत पण पाऊस आणि इतर खराब हवामानुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तुलुम स्टेशन आहे जिथे ट्रेन थांबायची होती. अशी माहिती डीजीपी पी डोंगेल यांनी दिली आहे.
8 / 8
या घटनेत जखमी झालेल्या जवान व नागरिकांच्यावर आर्मी मेडिकल युनिट मध्ये उपचार केले जात आहे. तसेच घटनेत गंभीर जखमी जवानांना इम्फाळ व इतर ठिकाणच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.