Last sunset of the year 2021 : मावळतीच्या सूर्याचं रूप मोबाइमध्ये टिपत सरत्या वर्षाला निरोप, पाहा Photos
वर्ष 2021चा सूर्य मावळलाय. आता वेध 2022चे लागलेत. भारतभरात 31 डिसेंबरच्या रात्री या वर्षाला निरोप देण्याची तयारी होतेय. देशभरात विविध ठिकाणच्या मावळतीच्या सूर्याच्या छटा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
1 / 5
वर्ष 2021चा सूर्य मावळलाय. आता वेध 2022चे लागलेत. भारतभरात 31 डिसेंबरच्या रात्री या वर्षाला निरोप देण्याची तयारी होतेय. तसंच येणाऱ्या वर्षाच्या स्वागताचीही तयारी जल्लोषात होतेय. देशभरात विविध ठिकाणच्या मावळतीच्या सूर्याच्या छटा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राजधानी नवी दिल्लीतल्या विजय चौकातलं हे दृश्य आहे... याठिकाणी वर्षाच्या शेवटच्या मावळतीच्या सूर्याचं हे रूप कॅमेऱ्यात टिपलं आहे.
2 / 5
Juhu beach in Mumbai : राज्यासह देशभरात सरत्या वर्षाला निरोप दिला जातोय. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध आहेत. त्यामुळे नागरिकही सार्वजनिक ठिकाणी कमी गर्दी करताहेत. मुंबईतल्या जुहू बीच परिसरातलं हे मावळतीच्या सूर्याचं दर्शन
3 / 5
Dal lake, Srinagar : जम्मू काश्मीर राज्यात दाल लेक (दाल सरोवर) आहे. इथलं हे विहंगम दृश्य. बासीत झरगर यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केलं आहे.
4 / 5
Holiday camp beach, chorwad : गुजरातेतल्या हॉलिडे कॅम्प, चोरवाड इथला मावळतीचा सूर्य काही अनोखाच दिसतोय. निशित मकवाणा यांनी आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर केलाय.
5 / 5
Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या यावर्षीच्या अखेरच्या मावळतीचा सूर्य काही असा दिसत होता. हे वर्ष सरलं आता पुढच्या वर्षाच्या सूर्योदयाची वाट सर्वजण पाहात आहेत.