'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आता लवकरच रसिक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
या मालिकेनं रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. मात्र आता ही मालिका संपणार आहे.
हा आठवडा आता 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेचा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे सेटवर एक छानसं फोटोशूट करण्यात आलं आहे.
सोबतच मालिकेचा नायक राणादा ही भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी प्रचंड भावूक झाला आहे. त्यानं सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
" आजपासुन सर्वांची लाडकी "तुझात जीव रंगला" या मालिकेचा शेवटचा सप्ताह सुरु होत आहे तर जसं प्रेक्षकांनी आजवर या मालिकेवर प्रेम केलयं तसं या शेवटच्या आठवड्यातही करावं हिच विनंती... काय चालतंय नव्ह...अहो.. चालतंय की!...असं भलं मोठं कॅप्शन देत राणादानं पोस्ट शेअर केली आहे.
या फोटोमध्ये 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेची संपूर्ण टीम आहे.