PHOTO | लातूरच्या बैलजोडीला विक्रमी किंमत, नळेगावचा प्रसिद्ध बैल बाजार भरला

| Updated on: Feb 11, 2021 | 4:33 PM

लातूर जिल्ह्यातल्या नळेगाव येथील एका शेतकऱ्याच्या बैलजोडीला विक्रमी किंमत मिळाली आहे.

1 / 4

आपल्या पशुधनाला चांगली किंमत मिळावी अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. शेतीतल्या मशागतीचा हंगाम संपल्याने शेतकरी आपले पशुधन विक्रीला बाजारात आणत आहेत.

2 / 4
सर्वगुण संपन्न असलेल्या या बैलजोडीला लाखात किंमत मिळाल्याने शेतकरी प्रमोद बिरादार आनंदी आहेत. तर ज्यांनी खरेदी केली ते बीड जिल्ह्यातल्या धर्मापुरीचे शेतकरी महादेव दहिफळे हे देखील या बैलजोडीवर समाधानी आहेत. ज्या पशुधनावर शिवार फुलवायचा त्या पशुधनाच्या खरेदी विक्रीचा आनंदच काही और असतो . नळेगावच्या बाजारात प्रमोद बिराजदार यांची बैलजोडी विक्रीला आली होती. या बैलजोडीला तब्बल 1 लाख 81 हजार रुपये किंमत मिळाली आहे.

3 / 4
लातूर जिल्ह्यातल्या नळेगाव येथील एका शेतकऱ्याच्या बैलजोडीला विक्रमी किंमत मिळाली आहे. नळेगाव हे बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे.

4 / 4
मागील वर्षी कोरोनाचा प्रसार झाला. लॉकडाऊन लागला आणि यात्रा, बाजार यांच्यावर बंदी आली. यामध्ये जनावराचे बाजार देखील मागील एक वर्षापासून होऊ शकले नव्हते. त्यामुळे जातिवंत जनावराच्या विक्रीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे अर्थचक्र थांबले होते. मात्र, आता कोरोनांनंतर अनेक गोष्टी पूर्वपदावर येत असताना जनावरांचे बाजार देखील भरू लागले आहेत.