कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे हे वाक्य कानावर पडलं की हास्याची मेजवानी सुरु होते. गेली 6 वर्षे झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
गेल्यावर्षी या सेटवर स्पेशल गेस्ट आले होते. ते म्हणजे देवमाणूस आणि कारभारी लयभारी या मालिकांमधील कलाकार.
डिसेंबर 2020 मध्ये चला हवा येऊ द्याच्या सेटवर धुमाकूळ घालण्यासाठी दोन्ही मालिकांचे कलाकार थुकरटवाडीमध्ये पोहचले होते.
यावेळी सरु आजी आणि टोण्याचा डान्स परफार्मन्सने एकच धमाल उडवून दिली
हवा येऊ द्याच्या विनोदवीरांनी देवमाणूस आणि कारभारी लयभारी मालिकांवर स्पूफ करुन एकच हास्यकल्लोळ उडवून दिला होता.
देवमाणूस आणि कारभारी लयभारी मालिकेतील कलाकारांचा डान्स परफार्मन्स आठवड्यातील खास आकर्षण होतं.