गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधी नेहमी कारवाया होत असतात. मात्र काल जंगलात असणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.
राखीच्या संदेश देऊन गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनशील नारगुडा- ताडगाव जंगल परिसरात आदिवासी भगिनींची राखी नक्षलवाद्यांनी स्वीकारावी यासाठी एक वृक्षाला जय संघर्ष समितीने राखी बांधली.
नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सांविधानाच्या मार्गाने आत्मसमर्पण करावं, अशी साद आदिवासी भगिनींनी घातली.
तुम्ही जर प्रेमाच्या संविधानाच्या मार्गाने आत्मसमर्पण केलं तर पुढच्या वर्षी नक्की आम्ही राखी तुम्हाला बांधू असा संदेश देत जन संघर्ष समितीच्यावतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम जंगलात संपन्न झाला.