रेड वाईनमुळे मायग्रेन होऊ शकते. तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
चीजमुळेही डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. कारण चीजमध्ये टायरामाइनचं प्रमाण जास्त असतं.
चॉकलेटमध्ये आढळणारे कॅफीन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन दोन्हीमुळे डोकेदुखी होऊ शकते.
लोणचे आणि आंबलेल्या पदार्थांमध्ये टायरामाइन मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन मायग्रेन किंवा डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकते. कारण त्यामध्ये कॅफेन असते.
संत्री, मोसंबी, लिंबू आणि द्राक्षे यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये ऑक्टोमाइन नावाचे रसायन असते. ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
दुधामुळे डोकेदुखी वाढते. कारण त्यात लॅक्टॉस इनटॉलेरेंटचं प्रमाण असतं.
आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ मायग्रेनला चालना देऊ शकतात.