अंकुरलेली कडधान्य आणि फळभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. यात कोंब आलेला लसणाचाही समावेश आहे.कोंब आलेल्या लसणाचे सेवन केल्यास कोणताही तोटा अथवा नुकसान होत नाही.
असंतुलित आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे लाखो लोक कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. अंकुरित लसणाचे सेवन कर्करोगापासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याचे रोज सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
अंकुरित लसणाचे दररोज सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. अंकुरलेल्या लसणातील एन्झाईम्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे हार्ट ब्लॉकची समस्या टाळता येते.
अंकुरित लसूण खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसणात असलेले अँटिऑक्सिडंट तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.
लसणात भरपूर एन्झाईम असल्याने रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात. अंकुरलेल्या लसणात हे मुबलक प्रमाणात असते. रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते.
जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पाच दिवस उगवलेल्या लसणाच्या शेंगांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे अकाली वृद्धत्वाकडे वाटचाल करत असाल तर आजपासूनच अंकुरित लसूण खाण्यास सुरुवात करा.