मुंबई : आपल्या अनेक चुकीच्या सवयी अकाली केस (Hair) पांढरे होण्याच्या समस्यांना आमंत्रण देत असते. केस पांढरे झाल्याने आपले मानसिक खच्चीकरण होतेच शिवाय याचा आपल्या व्यक्तीमत्वावरही प्रभाव पडत असतो. अकाली केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. आपण घरच्या घरी काही उपाय केल्यास तसेच आहारात (Diet) बदल केल्यास या समस्येवर मात करता येते. केस पांढरे होत असल्यास त्यावर बाहेरील कृत्रिम उत्पादनांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत घरगुती उपायदेखील अधिक परिणामकारक ठरत असतात. आपल्या आहारात बदल करुन सकस आहाराला प्राधान्य देणे गरजेचे असते. आपल्या रोजच्या आहारात जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजांनी परिपूर्ण पदार्थांचा समावेश करा. दाट आणि निरोगी केसांसाठी तुम्ही कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता ते जाणून घेऊ.
सृदृढ आरोग्यासाठी नेहमी हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. पालेभाज्यांमध्ये फॉलिक अॅसिड असते जे आपले केस निरोगी ठेवते. हे टाळूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. हे पेशी वाढण्यास मदत करतात. रोजच्या आहारात पालक, फ्लॉवर इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकता.
अकाली केस पांढरे होण्यापासून वाचण्यासाठी मशरूम चांगला पर्याय आहे. मशरूममध्ये लोहाबरोबरच कॉपरही भरपूर प्रमाणात असते. मशरूममध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटी-बॅक्टेरियल आणि इतर अनेक गुणधर्म असतात. यामुळे डोक्यावरील कोंडा आणि इतर समस्या दूर होतात. मशरूममध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून केसांचे संरक्षण करते. मशरूम केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवते.
‘ब्लू बेरी’मध्ये झिंक, आयोडीन, कॉपर आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात. हे मेलेनिन नावाचे द्रव्य तयार करण्यात मदत करण्यासाठी उत्तम आहेत. हे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते. यासोबतच केस घनदाट व चमकदार होतात.
शरीराच्या पोषक घटकांसाठी सुका मेवा हा एक उत्तम पर्याय आहे. याने केसांसोबत शरीराला अनेक फायदे मिळत असतात. नाश्तासोबत अनेक पदार्थांची चव वाढवण्यात सुका मेवा फायदेशीर ठरत असतो. सुका मेवा केस आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरतो. सुका मेवा केसांना पांढरे होण्यापासून रोखतो.
सॅल्मन माशात ओमेगा-३ असते जे दाट व चमकदार केसांच्या निर्मितीसाठी मदत करते. त्यात खनिजे, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील असतात. याशिवाय ट्यूनामध्ये फॅटी अॅसिड ओमेगा-३ आणि प्रोटीनचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी हे एका वरदानापेक्षा कमी नाही.
अॅपल सायडर व्हिनेगरमुळे कोंड्याची समस्या झटपट दूर होईल! तुम्हाला माहीत आहे कसे?
Hot water benefits: रात्री झोपताना गरम पाणी आवर्जून प्यावं! जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे
Sleeping tips: चांगली झोप लागावी यासाठी नेमकं काय करावं? जाणून घ्या खास टीप्स