Diabetes Control : मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी या भाज्या ठरतात वरदान, कसं ते वाचा
रोजच्या धकाधकीच्या युगात मधुमेहासारखा आजार कधी जडतो कळत देखील नाही. अनेकांना तर आपल्याला मधुमेह आहे याची कल्पना देखील नसते. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. मात्र हा आजार नियंत्रणात ठेवू शकता.
1 / 6
रोजचा सकस आहार, व्यायाम, चालणे, ध्यान किंवा योगासने करून मधुमेह नियंत्रणात आणता येतो. मधुमेह असलेल्या लोकांनी आहारात जीवनसत्त्व असलेल्या भाज्या समाविष्ट करणं गरजेचं आहे. कारण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनसत्त्व खूप महत्त्वाची आहेत.
2 / 6
ब्रोकोली ही पौष्टिक भाजी आहे. विशेषत: या भाज्यांमध्ये लोह, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, सेलेनियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यात व्हिटॅमिन के देखील मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन के मधुमेह असलेल्या रुग्णांमधील रक्तवहिन्यासंबंधी गुंतागुंत टाळते. हृदयाचे आरोग्य राखते.तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
3 / 6
कोबीच्या पानांमध्ये मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. शिजवलेल्या कोबीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. कोबीच्या पानात फायबर, प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते. आहारात कोबीच्या पानांचा समावेश करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकतात.
4 / 6
लेट्यूसमध्ये मानवी शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. उल्लेखनीय म्हणजे, या भाजीमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. तसेच या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
5 / 6
हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरी कमी आणि पोषक तत्वे जास्त असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के भरपूर असल्याने, ही हिरव्या पालेभाज्या मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरते.
6 / 6
मेथीची पानांची कडू चव जरी कडू असली तरी ते आरोग्यवर्धक आहे. आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक यात असतात. आपल्या रोजच्या आहारात वापर केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. यात फायबर, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के भरपूर असतात. हे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.