दागिनेच दागिने..! अंबांनी कुटुंबातील महिलांनी परिधान केलेल्या ज्वेलरीची किंमत वाचून व्हाल आवाक्
NMACC : 31 मार्च रोजी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी अंबांनी कुटुंबातील महिलांनी परिधान केलेले दागिने चर्चेचा विषय ठरला होता. या दागिन्यांची किंमत ऐकून आवाक् व्हाल.
1 / 6
अंबांनी कुटुंबातील महिलांचे दागिने पाहून अनेकदा प्रश्न पडतो की, ज्वेलरी किंमत नक्की किती असावी. कोट्यवधींच्या घरात असली तरी किती असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
2 / 6
नीता अंबानी यांच्या मालकीच्या एनएमएसीसीचं भव्य उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यातील त्यांनी परिधान केलेले दागिने चर्चेचा विषय होता.
3 / 6
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या हिऱ्याच्या अंगठीची किंमत 40 कोटी रुपये आहे. हिरे अंदाजे 80 ते 90 कॅरेट्सचे आहेत.
4 / 6
उद्घाटन सोहळ्यात मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी परिधान केलेल्या हिऱ्याच्या नेकलेसची किंमत 200 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हा नेकलेस ईशाला तिच्या साखरपुड्यात गिफ्ट दिला होता.
5 / 6
नीता अंबानी यांनी त्यांची सून श्लोका मेहता हिलाही जगातील सर्वात महागडा हिऱ्यांचा हार गिफ्ट दिला होता. या नेकलेसची किंमत 450 कोटी रुपये आहे.
6 / 6
या हिऱ्यांच्या नेकलेसचं पेडंट पिवळ्या रंगाचं असून हा जगातील सर्वात शुद्ध हिरा असल्याचं सांगितलं जात आहे.