Raksha Bandhan Fashion Tips: रक्षाबंधनाला काही मिनिटांत करा ट्रेंडी हेअरस्टाइल ! प्रत्येक ड्रेसवर दिसेल तुमचा लुक परफेक्ट..
महेश घोलप |
Updated on: Aug 20, 2022 | 1:01 PM
सण-उत्सव असो की समारंभ महिला, मुलीचं श्रृंगार.. आलच..मग, याच मेकअप साठी लागतो तासनतास वेळ मात्र, आता वेळखाऊ मेकअप मध्ये चुटकी सरशी केसांची हेअरस्टाइल करता येईल अशा काही खास टिप्स आणि विशेष हेअरस्टाईलच्या सोप्या आयडीया आज आपण पाहणार आहोत.
1 / 5
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. या सणामध्ये बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना (Prayer for health) करतात. भाऊ देखील आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन घेतात. बहिणी कडून ओवाळणी केल्यावर भाऊ भेटवस्तू देतात. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सर्वात मोठा सण (The biggest festival) असल्याने या निमित्ताने प्रत्येक बहिणीला सुंदर दिसावे असे वाटते. सणासुदीला बहिणीचा मान तो सर्वोच्च असतोच नवीन आणि सुंदर कपडे, मॅचिंग आणि ट्रेंडी ज्वेलरी घ्या. याशिवाय सुंदर दिसण्यासाठी मेकअप वर तासनतास खर्ची घातले जातात. पण परफेक्ट लूकसाठी स्टायलिश आउटफिट्स, ज्वेलरी आणि मेकअपसोबत ट्रेंडी हेअरस्टाइलही (Trendy hairstyles too) आवश्यक आहे. या रक्षाबंधनाला जर मुली पारंपारिक लुकचा अवलंब करत असतील तर त्या काही सोप्या आणि झटपट केशरचना करू शकतात. जाणून घ्या, काही सहज बनवता येण्याजोग्या स्टायलिश हेअरस्टाइल टिप्स.
2 / 5
लो-मेसी बन ट्रेंडमध्ये आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही पारंपारिक कपडे घातले असतील अन् तर त्यावर चांगली केशरचनाही आवश्यक असते. अशावेळी लो-मेसी बन तुम्ही करू शकता. हे बनवायला सोपे आहे आणि पटकन बनवता येते. जर तुमचे केस खांद्याच्या लांबीपर्यंत असतील तर कमी किचकट अंबाडा बनवणे चांगले. तुम्ही बनसोबत डिझायनर हेअर अॅक्सेसरीज देखील वापरू शकता. यामध्ये हेअर रोलर्सच्या मदतीने केसांना वेव्ही लुक देण्यासाठी मेसी बन बनवा.
3 / 5
फिश-टेल हेअर स्टाइल- सूट असो वा साडी, तुम्ही फिश टेल हेअरस्टाइल अवलंबू शकता. या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल. फिश टेल हेअरस्टाइल बनवण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागता. यासाठी केसांचे दोन भाग करा आणि दोन्ही बाजूंनी थोडे केस घेऊन पातळ वेणी करा. केस परत घ्या. पारंपारिक पोशाख असो किंवा वेस्टर्न आउटफिट, दोन्हींवर तुम्ही अशा प्रकारची केशरचना करू शकता.
4 / 5
हाफ-टाय हेअरस्टाईल साडीपासून सूटपर्यंत कोणत्याही आउटफिटसोबत करता येते. हे करण्यासाठी काही केस बांधताना बाकीचे केस मागून मोकळे सोडले जातात. सर्व प्रथम, आपले केस मऊ कर्ल करा. नंतर, समोरच्या बाजूने मध्यभागी बनवा, दोन्ही प्रकारचे केस एका मोकळ्या शैलीत परत मागे घेऊन ते पिन करा. बाकीचे केस उघडे ठेवा. या हेअरस्टाईलने तुमचा लुक स्टायलिश दिसेल.
5 / 5
हाफ अप ब्रेडड बन ही केशरचना देखील अतिशय स्टाइलिश आहे. या हेअरस्टाईलमध्ये अर्ध्या केसांचा बन बनवला जातो आणि बाकीचे केस मोकळे सोडले जातात. केशरचना करण्यासाठी, क्राऊन एरिया (डोक्याचा वरचा भाग)पासून केसांचा एक भाग वेगळा करून केसांना तीन भागांमध्ये विभाजित करा आणि फ्रेंच वेणी बनवा. नंतर या वेणी किंवा ब्रेडपासून बन बनवा. बॉबी पिनच्या मदतीने बन सेट करा.