ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) नियमानुसार हॉलमार्क ज्वेलरी खरेदी केली पाहीजे. तसेच खरेदी केल्यानंतर अधिकृत बिल किंवा रिसिप्ट घेणं गरजेचं आहे. जर खरेदीनंतर काही समस्या उद्भवली तर तुमचं बिल तुम्हाला मदत करू शकते. (File Photo)
बीआयएसच्या मत तुमच्या बिलामध्ये हॉलमार्क ज्वेलरीबाबत माहिती असणं गरजेचं आहे. किती दागिने आहेत, त्यांची संख्या, त्यांचं वजन, कॅरेट आणि हॉलमार्कची माहिती असणं आवश्यक आहे. (File Photo)
बिल घेताना आपण कोणता दागिना घेतला त्याचं नाव देखील महत्त्वाचं आहे. जसं की सोन्याचं मंगळसूत्र घेतलं असेल तर त्यात नमूद केलेलं असावं. तसेच 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट आहे याबाबत माहिती असावी. सोन्याचा सध्याचा भाव, बनवण्यासाठीचा खर्च, हॉलमार्क आणि जीएसटीची माहिती असावी. (File Photo)
जर तुमच्या दागिण्यांमध्ये कोणता स्टोन लावला असेल तर त्याची माहिती देखील असावी. स्टोन कोणता आहे, किती कॅरेट आहे, किती वजन आहे याची माहिती असावी. (File Photo)
जर तुम्ही घेतलेल्या सोन्यात काही फसवणूक झाली असं वाटत असेल तर तुम्ही शुद्धता बीआयएसच्या एसेंइग अँड हॉलमार्किंग सेंटवर जाऊन तपासू शकता. यासाठी तुम्हाला तपासणी खर्च द्यावा लागेल. बीआयएसने याबाबत सेंटर्सची एक यादी https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2022/04/List-of-89-Centres-provided-Central-Assistance-with-amount.pdf जाहीर केली आहे. (File Photo)