Nobel Prize 2020 Photos: कुणाला, कोणता नोबेल पुरस्कार मिळाला, पुरस्कार्थींची संपूर्ण यादी
नोबेल पुरस्कार स्वीडनचे संशोधक अल्फ्रेड बनार्ड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येतात. अल्फ्रेड यांनी मृत्यूआधी आपल्या संपत्तीतील मोठा वाटा नोबेल ट्रस्टला दिला. त्याच पैशातून मानवी हितासाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार द्यावा असा त्यांचा उद्देश होता.
नोबेल पुरस्कार स्वीडनचे संशोधक अल्फ्रेड बनार्ड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येतात. अल्फ्रेड यांनी मृत्यूआधी आपल्या संपत्तीतील मोठा वाटा नोबेल ट्रस्टला दिला. त्याच पैशातून मानवी हितासाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार द्यावा असा त्यांचा उद्देश होता. पहिला नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता. नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांतीच्या क्षेत्रासाठी देण्यात येतो. पुरस्काराचं स्वरुप एक मेडल आणि 1 कोटी स्वीडिश क्रोना म्हणजेच जवळपास 8 कोटी रुपये मिळतात.
-
-
2020 च्या वैद्यकीय विभागातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize) अमेरिकेचे हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस आणि ब्रिटिश संशोधक मायकल ह्यूटन यांना देण्यात आला आहे ( Hepatitis C researcher get Nobel Prize 2020). या तिघांनाही कॅन्सर आणि सिरोसिसचा कारणीभूत ठरणाऱ्या हेपेटायसिस सी (Hepatitis C) या विषाणूचा शोध लावण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.
-
-
भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा 3 शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलंय. रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल, एन्ड्रिया गेज या 3 शास्रज्ञांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय. ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं. तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोन्ही शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला. त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे. त्यामुळंच त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
-
-
रसायनशास्त्रातील (केमिस्ट्री) यंदाचा नोबेल पुरस्कार दोन महिला वैज्ञानिकांना मिळाला आहे. इमानुएल शॉपोंतिये (फ्रान्स) आणि जेनिफर ए डुडना (अमेरिका) असं या संशोधकांचं नाव आहे. त्यांना ‘जीनोम एडिटिंग’ची एक पद्धत विकसित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या शोधानंतर लाईफ सायन्स एका नव्या उंचीवर पोहचणार आहे. यामुळे संपूर्ण मानवतेला खूप मोठा फायदा होईल, असं मत नोबेल पुरस्कार समितीने व्यक्त केलं आहे.
-
-
अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. लुईस यांचा त्यांच्या असामान्य काव्यात्मक अभिव्यक्तीसाठी सन्मान करण्यात आला. लुईस येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म 1943 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्यांच्या कविता नेहमीच बाल्यावस्था, कौटुंबिक जीवन, आई-वडील आणि भाऊ-बहिण यांच्या परस्पर संबंधांवर केंद्रीत होतात, असं मत नोबेल पुरस्कार समितीने व्यक्त केलं आहे.
-
-
जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ म्हणजेच ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ (WFP) ही संस्था ठरली आहे (World Food Programme got 2020 Nobel Peace Prize). “‘डब्ल्यूएफपी’ला जागतिक स्तरावरील भुकेचा प्रश्न सोडवणे, युद्धजन्य परिस्थितीत परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि युद्ध आणि संघर्षासाठी होत असलेला भुकेचा दुरुपयोग रोखण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांसाठी या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे,” अशी माहिती नोबेल पुरस्कार समितीने दिली.
-
-
यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना मिळाला आहे. ऑक्शन थिअरीमध्ये सुधारणा आणि ऑक्शन करण्याच्या नव्या पद्धतींचा शोध यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.