गेल्यावर्षी दादर परिसराचा समावेश असलेला जी-साऊथ वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता.
दरम्यान, रविवारी महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता कोरोनाच्या नियमांचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय लातूर जिल्हा प्रशासनानंही नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुब दिवेगावकर म्हणाले की कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात अनेक लोकांना या विषाणूची लागण झाली. ते म्हणाले की, जिल्ह्यात दररोज नाईट कर्फ्यू लावण्याबरोबरच प्रत्येक रविवारी सार्वजनिक कर्फ्यू लावण्यात येणार आहे.
त्यांनी लोकांना दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 17,790 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 16,864 रुग्ण बरे झाले आहेत, तर 587 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात 339 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोना प्रकरणातील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता लातूर प्रशासनानंही 15 मार्चपासून सकाळी आठ ते पाच दरम्यान कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला.