अभिनेता अक्षय कुमार याने सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार याने पहिल्यांदा मतदान केलं. ‘माझा भारत विकसित आणि मजबूत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून मी मतदान केलं' असं त्याने नमूद केलं.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेही सकाळी मतदानाचे कर्तव्य पार पडले. सर्व लोकांना घराबाहेर पडून मतदान करावे असं आवाहन तिने केलं.
प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव याने मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे हे ापल्या देशाप्रती असलेले आपले मोठे कर्तव्य आहे असे सांगत सर्वांनीच मतदान केले पाहिजे, असे त्याने नमूद केले.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्सचे अनिल अंबानीसुद्धा सकाळीच बाहेर पडले. सकाळी ६.४५ च्या सुमारास मतदान सुरु होण्यापूर्वी ते रांगेत उभे होते. कुलाबा मतदान केंद्राबाहेर मतदान सुरु होण्याची ते वाट बघत होते.
अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तर याने त्याची बहीण व दिग्दर्शिका झोया अख्तर तसेच आईसोबत जाऊन मतदानाचा अधिकार बजावला.
अभिनेत्री सनाया मल्होत्रा हिनेही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.