गोडवा उतरणारच नाही : मध्यंतरीच्या थंडीमुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षामध्ये गोडवा उतरलाच नव्हता. त्यामुळे आता उनामध्ये वाढ झाली तरी द्राक्ष गोड होणार होती. पण निसर्गाच्या मनात काही औरच होते. भर ऊन्हाळ्याच्या तोंडावर पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले आहे. त्यामुळे द्राक्षामध्ये गोडवा निर्माण होणार की नाही याबाबत शंका आहे.
आता थेट घडावर परिणाम: अवकाळीमुळे बागांवर परिणाम झाला तर औषध फवारणी करुन पुन्हा बागा जोमात आणल्या जात होत्या पण सध्याच्या पावसामुळे थेट द्राक्षावरच परिणाम होत आहे. द्राक्ष काळवंडले जात असून तोडणीसाठी अडचणी निर्माण होणार आहेत. या पावसामुळे द्राक्षाचे दुहेरी नुकसान होणार आहे.
रासायनिक कीडनाशकाच्या फवारणीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते.
विजेचा कडकडाट अन् जोराचा पाऊस : निसर्गाची अवकृपा यंदा नाशिक जिल्ह्यावरच काही अधिकच राहिलेली आहे. द्राक्ष उत्पादन घेताना दोन दिवसातून एकदा औषध फवारणी ही करावीच लागते. पोटच्या लेकरापेक्षा या बागांची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागत असताना सततच्या नुकसानीमुळे यंदा उत्पादनावरील खर्चात वाढ झाली आहे.