Madhuri Dixit : धकधक गर्ल.. माधुरीचे दीक्षितचे फोटो पाहून चाहते म्हणतात…
माधुरी दीक्षितने वयाची 50 शी ओलांडली आहे . पण तरीही ती फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. ती तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते.
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत . ती चित्रपटांपासून दूर गेली असली तरी ती टीव्हीवरील रिअॅलिटी शोमध्ये दिसून येते. याशिवाय तिने ओटीटीवरही पदार्पण केले आहे. सोशल मीडियावर तिच्या सुंदर फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेत असते. माधुरी दीक्षितने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर लूकमधील फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 5
माधुरी दीक्षितने वयाची 50 शी ओलांडली आहे . पण तरीही ती फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. ती तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते. माधुरीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पिंक कलरच्या साडीमध्ये सुंदर स्टाईलमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने या लुक सोबात हलका मेक-अपकेला असाउन कानातले आणि ब्रेसलेटसह आपला लूक पूर्ण केला आहे.
3 / 5
माधुरीचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट मध्ये लिहिले आहे कि - मॅडम, दिवसेंदिवस तुम्ही अधिक सुंदर होत चालला आहात. ' लव्ह यू मॅडम' ,आणखी एका युझरने लिहिले आहे की हाय , मी मर जावा , आणखी एका चाहत्याने लिहिले - तुझ्या सौंदर्याचे एका वाक्यात वर्णन करता येणार नाही, तू खूप गोंडस आणि सुंदर आहेस. त्याचप्रमाणे इतर चाहतेही हार्ट आणि फायर इमोटिकॉनद्वारे त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
4 / 5
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर माधुरी दीक्षित सध्या 'झलक दिखला जा' सीझन 10 मध्ये ज्युरी म्हणून कार्यरत आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी ती 'द फेम गेम' या वेब सीरिजमध्ये दिसली होती .
5 / 5
लवकारच तिची भूमिका असलेला 'माझा मा' या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर स्ट्रीम के ला जाऊ शकतो. आनंद तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.