बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने 3 मध्ये प्रशिक्षण करतेय.
डान्स दीवानेच्या सेटवरील 18 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर सेटवर मोठी सावधगिरी बाळगली जात आहे. अशावेळी माधुरी दीक्षित आपल्या परिवारासोबत मालदीवमध्ये धमाल केली. तिने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुट्टी घालवण्यासाठी सध्या मालदीवचा पर्याय निवडत आहेत. आता या यादीत माधुरी दीक्षितच्या नावाचाही समावेश झाला आहे.
आता माधुरीनं नवनवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.
हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.