दिल्लीतील प्रसिद्ध हनुमान मंदिरात खासदार नवनीत व आमदार नवनीत राणा यांनी महाआरती केली आहे. दिल्लीतील पाच हजार जुन्या पांडवकालीन हनुमान मंदिरात ही आरती करण्यात आली.
हनुमान मंदिरातील आरतीसाठी निघालेल्या राणा दाम्पत्यांच्या सोबत महंत तसेच कार्यकर्त्याचाही मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या जात होत्या.
दिल्लीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर अनेक राजकीय नेतेही दर्शन घेण्यासाठी तसेच पूजापाठ करण्यासाठी येत असतात. आपल्या मनातील ईच्छापूर्ण होतात. यासाठी राणा दाम्पत्यांनी या मंदिराची निवड केली आहे.
या महाआरतीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्या समोर मतदार संघात निवडणूक लढवावी असे म्हटले आहे.