Maha Kumbh Mela 2025 : 144 वर्षानंतरचा अनोखा क्षण, देश-विदेशातील लाखो भाविकांची अक्षरश: लाट, पाहा खास फोटो
शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा भारतात सुरु आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात.
1 / 10
जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या महाकुंभ मेळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभचा दिमाखदार मेळावा पार पडणार आहे.
2 / 10
3 / 10
उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होत आहे. यानिमित्ताने या नद्यांच्या संगमावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
4 / 10
प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. या कुंभमेळाव्यातील पहिले शाही स्नान 13 जानेवारी म्हणजे आज पार पडणार आहे.
5 / 10
तर दुसरं शाही स्नान 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी असेल. यानंतर तिसरं स्नान 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येदिवशी होईल.
6 / 10
तर चौथं स्नान 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमी दिवशी होईल. यानंतरचे पाचवे शाही स्नान 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा दिवशी आणि शेवटचं शाही स्नान 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री दिवशी असेल.
7 / 10
शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा भारतात सुरु आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात.
8 / 10
हा मेळा ज्या शहरातील नद्यांच्या किनाऱ्यावर आयोजित केला जातो, त्या नद्यांना देखील भारतीय परंपरेत विशेष महत्त्व प्राप्त आहे. यंदा तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जातं आहे.
9 / 10
जगभरातून जवळपास 40 कोटी नागरिक महाकुंभला हजेरी लावण्याची शक्यता आहे.
10 / 10
सर्व फोटो - Maha Kumbh 2025/ट्विटर