हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा (Mahashivratri 2022) विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात.
माता पार्वतींप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास ठेवतात आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात.
महाशिवरात्री निमित्त टाळ मृदुंगाच्या गजरात दूमदूमली मुक्ताईनगर सजली आहे. आज सकाळपासूनच महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईचे दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविक घेत आहेत.
दोन वर्षांनंतर महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये मुक्ताईच्या भेटीने आनंद झाला आहे. शेकडो वर्षांची महाशिवरात्री मुक्ताई उत्सव होतोय साजरा होत आहे. कोरोनाचे नियम पाळात महाराष्ट्रातील अनेक दिंड्या मुक्ताईनगर मध्ये दाखल झाले आहेत.
कोरोना मुळे दोन वर्षांपासून आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन महाराष्ट्रातील वारकऱ्यांना होत नव्हते आज मंदिर खुले असल्याने महाराष्ट्रातील वारकरी मुक्ताईचे दर्शन घेत आहे.