चला पहाटे..पहाटे देव केव्हाचा जागला, एका क्लीकवर अष्ठविनायकाचे दर्शन घ्या…

| Updated on: Sep 04, 2024 | 3:04 PM

महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे दर्शन सर्वात प्रसिद्ध आहे. गणपतीही बुद्धीची देवता मानली जाते.गणेश चतुर्थी अगदी तोंडावर आली आहे. येत्या सात सप्टेंबर पासून महाराष्ट्रासह जगभरात अनेक ठिकाणी गणपतीचे आराधना केली जाणार आहे. टाळ मृदुंगाच्या तालावर आरत्या गायल्या जाणार आहेत. घरातील वातावरण बाप्पाच्या आगमनाने प्रफुल्लीत होणार आहे. महाराष्ट्रात अष्ठविनायकाचे दर्शन खूपच पवित्र मानले जाते. तर कुठे आहेत अष्टविनायकाची जागृत देवस्थाने ते आपण एका क्लीकवर पाहूयात...

1 / 8
1.मयुरेश्वर/मोरेश्वर, मोरगाव फार पूर्वी मिथिल देशातील गंडकी नगरात राजा चक्रपाणी राज्य करीत होता. पूत्र नसल्याने राजा चिंतेत होता. शौनक ऋषींनी त्याला सूर्योपासना सांगितली. त्यामुळे त्याला पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. त्यानेही उपासना करून अमरत्व प्राप्त केले आणि उन्मत्त झाला.सिंधू राजाने देवलोकासही त्रस्त केले. तेव्हा श्रीगणेशाने मयूर वाहनांवरून दैत्याचा पराभव केला आणि कमलासूराचा शिरच्छेद केल्यावर त्याचे डोके जिथे पडले ते मोरगांव ! कऱ्हा नदीच्या काठी वसलेले हे गांव मोराच्याच आकाराचे आहे. गणेश पुराणात केवळ मयूरेश्वरचाच उल्लेख आहे.

2 / 8
2.सिद्धिविनायक, सिद्धटेक भीमा नदीच्या काठावर हे क्षेत्र आहे.केडगावचे नारायण महाराज आणि मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाली. अतिप्राचीन काळी जेव्हा ब्रम्हदेव सृष्टी रचनेच्या कामात निमग्न होते तेव्हा मधू-कैटभ या दोन राक्षसाचा जन्म झाला. ते ब्रम्हदेवाच्या कार्यात विघ्न आणू लागले.मग अनेक प्रयत्नांनीही जेव्हा हे विघ्न दूर होईना तेव्हा भगवान विष्णूंनी महादेवाला विचारले. महादेवांनी सांगितले की, श्रीगणेशस्तवन न करता कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. तेव्हा श्रीविष्णुंनी 'श्री गणेशाय नमः' या षडाक्षरी मंत्राचा जप केला. श्रीगणेशांनी त्यांना सिद्धी दिली. जिथे ही सिद्धी मिळाली तिथे गंडकशिलेची-विनायकाची स्थापना केली. इथे सिद्धी प्राप्त होते म्हणून हे सिद्धटेक आणि येथील गणेश सिद्धिविनायक असे नाव पडले

3 / 8
3.बल्लाळेश्वर,पाली (महाराष्ट्र) कृतयुगात म्हणजे आजपासून जवळजवळ 40-42 लक्ष वर्षांपूर्वी सिंधू देशात कोकण-पल्लीद या गावी एका सदाचरणी व्यापाराच्या पोटी एक मुलगा जन्मला. त्याचे नाव बल्लाळ होते. तो बालवयातच गणेश भक्तीत लीन झाला. व्यापाऱ्याच्या मनात चिंता निर्माण झाली.एकदा त्याने आपल्या मुलाला ध्यानस्थ असताना पहिले आणि बदडले.  व्यापाऱ्याने "बघू तुझा गणेश काय करतो ते" असे म्हटले तेव्हा साक्षात श्रीगणेश प्रगट झाले. बल्लाळला पूर्ववत केले आणि शिळारूप होऊन गुप्त झाले. तेच हे बल्लाळेश्वर, कोकणातील रायगड जिल्ह्यात पाली गाव आहे.

4 / 8
4. महागणपती, रांजणगाव (महाराष्ट्र) महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे प्राचीन देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे

5 / 8
5.विघ्नेश्वर,ओझर (महाराष्ट्र) अभिनंदन नावाच्या राजाने इंद्र पदासाठी यज्ञ सुरु केला. इंद्र भयभीत झाला. आपले आसन जाणार याची चिंता करू लागला. नारदाने युक्ती सांगितली. काळाला त्या यज्ञात विघ्न निर्माण करण्यासाठी पाठविले. गजानन त्यावेळी पाराशरांच्या आश्रमात होते. त्यांचे काळाशी तुंबळ युद्ध केले. काळाने अनेक रूपे धारण केली. पण गजाननाने त्याला जेरबंद केले. ते विविध रूपांतही असू शकते आणि त्यासाठी काळाला जिंकण्यासाठी श्रीगजाननाची आराधना करावी लागते. या प्रकारानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाची स्थापना केली. तेच हे कुकडी नदी किनारी असलेले ओझर विघ्नसुराच्या विनंतीवरून श्रीगणेशानी विघ्नेश्वर नाव धारण केले.

6 / 8
6.वरदविनायक, महड (महाराष्ट्र) रायगड जिल्यातच पूर्वीच्या काळी भद्रक किंवा पुष्पक नावाचे अरण्य होते. तेथे गृत्समद नावाच्या ऋषींनी घोर तपश्चर्या करून श्रीगणेशाला प्रसन्न करून घेतले. गृत्समदाच्या आईने काम मोहित होऊन पापाचरण केले होते आणि त्यातूनच ऋषींचा जन्म झाला होता. लोक त्यांची कुचेष्टा करीत अशा ह्या पापातून मुक्त होण्यासाठीच गृत्समदानी गणेशाला तपाचरण करून प्रसन्न करून घेऊन गणेशांना इथेच राहा, अशी विनंती केली.वर देणारा तो वरदविनायक म्हणून प्रसिद्ध आहे.

7 / 8
7.चिंतामणी, थेऊर (महाराष्ट्र) कदंब तीर्थ किंवा थेऊर म्हणून मान्यता असलेल्या या ठिकाणी कपिल मुनींनी चिंतामणी रत्नांची मला प्राप्ती व्हावी, अशी इच्छा दुर्गादेवींना केली.दुर्गादेवीने त्यांना विनायकाची प्रार्थना करण्यास सांगितले. विनायकाने ज्या गणाकडे ते रत्न होते त्याच्याशी युद्ध करून ते मिळविले आणि महर्षी कपिलमुनींना दिले.तेव्हा त्या मण्याच्या प्राप्तीसाठी झालेले तुंबळ युद्ध पाहून कपिलांना उद्वेग आला. आणि रत्नाचा मोह नष्ट झाला. विनायकांना ते म्हणाले की, मला त्या मण्याची अभिलाषा राहिली नाही. तेव्हा श्रीविनायकांना आनंद झाला आणि तेथे स्वतःचे नांव चिंतामणी असे धारण केले.

8 / 8
8.गिरिजात्मज, लेण्याद्री (महाराष्ट्र) गिरिजात्मक नावाप्रमाणे डोंगर लेण्यात वसलेला आहे.गिरी म्हणजे पर्वत जा-जातक म्हणजे पार्वती तिचा आत्मज जो गिरिजात्मक. देवाधिदेव श्रीगणेश आपल्या पोटी पुत्र म्हणून यावे, अशी पार्वतीने इच्छा प्रगट केली होती. त्यासाठी तिने बारा वर्षे तप केले. पुष्पावती नदीजवळ असलेल्या डोंगराळ प्रदेशातच गणेशाने बाललीला केल्या. अनेक दैत्यांचा, प्राणीरूपाने उपद्रव देणाऱ्या दुष्टांचा नाश केला. भौगोलिक दृष्टीने हा प्रदेश दुर्गमच आहे. डोंगरामध्ये कोरलेले विस्तीर्ण मंदिर, पाठमोरी मूर्ती आणि जवळजवळ सरळ चढ असणाऱ्या तीनशे पायऱ्या, चार महिने धुक्याची वाट अशी वैशिष्ट्ये आणि बाजूला बौद्ध स्तुपे स्तिमित करणारी आहेत.