रायगडमधल्या खालापूरमध्ये दरड कोसळली आहे. 200-250 लोकसंख्या असलेल्या खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावावर ही दरड कोसळलीये. त्यामुळे अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलंय.
इर्शाळवाडीमध्ये NDRF च्या जवानांकडून मदत कार्य केलं जात आहे. स्थानिकही या मदतकार्यात सहकार्य करत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले आहेत.
मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षातून ते संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत.
इर्शाळवाडीतील या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण अजित पवार करत आहेत.
दुर्घटनाग्रस्तांपर्यंत मदतकार्य वेगात पोहोचायला हवं, अशा सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.
प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.