Loksabha Election 2024 : ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा अधिकार

| Updated on: May 13, 2024 | 3:12 PM

देशभरात आज लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असून महाराष्ट्रातही ११ जागांवर मतदान होत आहे. सुबोध भावे, प्रविण तरडे, आर्या आंबेकर, सोनाली कुलकर्णी यांसह अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

1 / 6
सुप्रसिद्ध गायक-संगीतकार सलील कुलकर्णी यांनी मुलगा शुंभकरसह मतदान केलं. जास्तीत जास्त लोकाना घराबाहेर पडण्याचे आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केलं.  सोशल मीडियावर भांडून काहीही होत नाही , विचार करून मतदान करायला हवं. मतदान ही कंपल्शन करण्यासारखी गोष्टच नाही, ते स्वतःला आतून वाटलं पाहिजे असं ते म्हणाले.

2 / 6
अभिनेत्री श्रुती मराठे हिनेही सहकुटुंब जाऊन मतदान केले. मी तर मतदान केलं, तुमचं काय ? असा सवाल तिने सर्वांना विचारत सोशल मीडियावर पोस्ट केली.

3 / 6
आज सकाळी अभिनेता सुबोध भावे यानेही पुण्यात मतदान केलं. सुबोध भावे आणि त्याच्या पत्नीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव आम्हाला आहे. कुठलीही निवडणूक असली तरीही मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो, कोणतेही मतदान आम्ही बुडवत नाही, असं त्याने नमूद केलं.

4 / 6
प्रसिद्ध टीव्ही कलाकार जुई गडकरी हिनेही मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

5 / 6
गायिका आर्या आंबेकर हिनेही मतदानाचा हक्क बजावला. हे आपले प्रथम कर्तव्य आहे, ते केलेच पाहिजे, असे तिने नमूद केले.

6 / 6
सुप्रिसद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही मतदानाचा हक्क बजावला.  कर्तव्य आणि अधिकार - नाण्याच्या दोन बाजू. कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही. लक्षात असूद्या. मतदान करा, असे आवाहन सोनालीने केलं.