Photo : मुंबईत लसीसाठी भली मोठी रांग, एकमेकांना चिटकून उभं राहण्याची वेळ, कोरोना कसा रोखणार?

| Updated on: Apr 29, 2021 | 12:35 PM

कोरोना लसीकरणासाठी झालेल्या गर्दीत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. (Long queues of people outside mumbai vaccination centre)

1 / 9
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी  पाहायला मिळत आहे.

2 / 9
मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये लस घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी जमली आहे.

3 / 9
एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहे.

4 / 9
त्यामुळेच मुंबईतील बीकेसी कोव्हिड सेंटरवर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.  तात्कळत उन्हात उभे राहायला लागत असल्याने अनेक नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.

5 / 9
मुंबईतील लसीकरण केंद्रावर आज दुपारी 12 नंतर कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. मात्र तरीही अनेक नागरिकांनी पहाटेपासून लसीकरण केंद्रांबाहेर रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहेत.

6 / 9
मुंबईत 136 पैकी 73 खाजगी लसीकरण केंद्र आहेत. त्यातील 40 लसीकरण केंद्र लस नसल्याने बंद राहणार आहेत.

7 / 9
तर जी केंद्र सुरु राहणार आहेत, त्यात बहुतांश दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

8 / 9
मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटरसह गोरेगावच्या नेस्को केंद्रावर दोन किमीपर्यंत गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच अनेक पालिका रुग्णालयांबाहेर अशाचप्रकारे लस घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

9 / 9
कोरोना लसीकरणासाठी झालेल्या गर्दीत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोना कसा रोखणार असा सवाल उपस्थित होत आहे.