Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, पुढचे 24 तास धोक्याचे, IMD कडून मोठी बातमी

| Updated on: Nov 01, 2024 | 7:00 AM

महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.मात्र अजूनही महाराष्ट्रात पावसाचं सावट कायम आहे.

1 / 7
महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.मात्र अजूनही महाराष्ट्रात पावसाचं सावट कायम आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

2 / 7
ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

3 / 7
हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

4 / 7
विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, वर्धा आणि नागपूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

5 / 7
पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

6 / 7
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

7 / 7
दरम्यान महाराष्ट्रावर दुहेरी संकट आहे. पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळाचा इशारा देखील देण्यात आला आहे. या काळात ताशी तीस ते चाळीस किमी वेगानं वारे वाहन्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.