Marathi News Photo gallery Mahashivratri 2022 special know about aghori in marathi Meditation while sitting on a corpse, one of the five forms of Shiva, hearing the life of Aghori
Mahashivratri 2022 | भयंकर ! प्रेतावर बसून ध्यान, शिवाच्या पाच रूपांपैकी एक, अघोरींचे जीवन ऐकून अंगावर काटाच येईल
अघोर म्हटल्या बरोबच आपल्या डोळ्यासमोर भगवान शिवाचे उपासक, मोठे केस असलेल्या नागा बाबांचे भस्म लावलेले चित्र डोळ्यासमोर येते. त्यांचे जीवन गुढ सहस्यांनी बनलेले आहे.
1 / 5
अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी, परमात्म प्राप्तीसाठी शुद्धतेच्या नियमांपासून दूर जावे लागते , असा अघोर तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आहे. अघोर म्हटल्या बरोबच आपल्या डोळ्यासमोर भगवान शिवाचे उपासक, मोठे केस असलेल्या नागा बाबांचे भस्म लावलेले चित्र येते. त्यांचे जीवन गुढ सहस्यांनी बनलेले आहे.
2 / 5
स्मशानभूमीत राहणाऱ्या या अघोरींसाठी महाशिवरात्रीची रात्र खूप खास असते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांच्या उपासक अघोरींच्या जीवनाशी संबंधित काही खास रहस्ये आहेत. अघोर हे शिवाच्या पाच रूपांपैकी एक आहे. अघोरींची भक्ती अत्यंत पवित्र मानली जाते, परंतु त्यांची जगण्याची पद्धत अत्यंत भीषण आणि विचित्र आहे.
3 / 5
अघोरींच्या जीवनाशी निगडीत सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ते त्यांच्या साधनेदरम्यान मृतदेहांशी शारीरिक संबंध बनवतात. याविषयी अघोरी सांगतात की ही शिव आणि शक्तीची पूजा करण्याची पद्धत आहे. ते सामान्य साधूंप्रमाणे ब्रह्मचर्य पाळत नाहीत. स्मशानभूमीत राहणारे अघोरी अर्धवट जळालेल्या प्रेतांचे मांसही खातात. प्रत्येक मूल अघोरी म्हणून जन्माला येते अशी अघोरींची श्रद्धा आहे. मुलाला अन्न आणि घाण यातला फरक कळत नाही, त्याचप्रमाणे अघोरी देखील प्रत्येक घाण आणि चांगले यातला फरक कळत नाही.
4 / 5
अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी, परमात्मप्राप्तीसाठी शुद्धतेच्या नियमांपासून दूर जावे लागते. असा अघोर तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आहे. सामान्यतः, अघोरी त्यांच्या समुदायात राहणे पसंत करतात आणि सामान्य सार्वजनिक जीवनात केवळ विशेष प्रसंगीच समोर येतात. या काळात त्यांच्यासोबत फक्त कुत्रे राहतात.
5 / 5
इतिहासाबद्दल बोललो तर हा शब्द 18 व्या शतकात दिसून आला. तसेच अघोर आणि कापालिक पंथ हे एकमेकांशी खूप साम्य आहेत. आज जरी अघोरींबद्दल काही गैरसमज आहेत, पण काही अघोरी खूप हुशार असल्याचं अनेक तज्ज्ञ सांगतात. अघोरी सुद्धा अनेक राजांना सल्ले देत असत. अघोरी शिव आणि शिवाची पत्नी शक्तीची पूजा करतात. जिथे लोक स्मशानभूमीला मृत्यूचे प्रतीक मानतात आणि तिथे राहतात. अघोरींना पूर्णपणे शिवामध्ये मग्न होऊन अघोरी साधना तीन प्रकारे करतात. यात शव साधना, शिव साधना आणि स्मशान साधना यांचा समावेश होतो. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)