इंग्रजी वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत, सध्या सर्वत्र मकर संक्रांतीचे वारे वाहत आहेत.
अशात तुमचे लाडके कलाकारसुद्धा या सणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
घरोघरी 'तिळगुळ घ्या गोडगोड बोला'असं म्हणत हा सण साजरा केला जातो. तसंच तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये देखिल हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या सेटवरसुद्धा मकर संक्रांतीची हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
संक्रांतीसाठी मस्त काळ्या रंगाचे कपडे परिधान करत तुमच्या लाडक्या कलाकारांनी धमाल केली आहे.