फालूदा पेय हे थंड आणि गोड असते. हे आपण घरीही बनवू शकता.
फालूदा पेय बनवण्यासाठी आपल्याला सब्जा, साखर, गुलाब सरबत, शेवई, दूध, जेली आणि आईस्क्रीम आवश्यक आहे.
सर्व प्रथम हे तयार करण्यासाठी आपल्याला दूध गरम करावे लागेल. दूधात साखर घालून उकळवा. त्यात थोडे गुलाब सरबत घालून मिक्स करावे.
यानंतर, एका ग्लासामध्ये गुलाब सरबत घाला, भिजलेला सब्जा आणि शिजवलेल्या शेवया घाला. यानंतर यात गुलाब सरबत मिसळलेले दूध घाला.
यानंतर यात आईस्क्रीम आणि गुलाब सरबत घाला. अशाप्रकारे फालूदा पेय तयार होईल. आता आपण ते सर्व्ह करू शकता.