अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लूक, फिटनेस, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात येते. तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झालेले असतात.
मलायका तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळे तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढताना दिसते.
मलायका इंस्टाग्रामवर दररोज तिचा नवनवीन लूक शेअर करत असते. तिने पुन्हा एकदा आपल्या सिझलिंग लुकचे सोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मलायका ऑरेंज कलरचा डिझायनर शॉर्ट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. तिने आपला लुकमध्ये न्यूड शिमरी मेकअप व स्मोकी आय सोबत हा लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीचा हा लूक पाहून अनेकदा तिच्या वयाचा अंदाजलावता येत नाही.मलायका 48 वर्षांची आहे. आजही मलायका तिच्या फिटनेस आणि बोल्ड लूकने कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.