लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर बॉलिवूडकरांनी एन्जॉय करण्यासाठी थेट मालदीव गाठलं आहे!
निळाशार समुद्र, थंडगार वारे, कमालीची शांतता यामुळे 'मालदीव' सध्या बॉलिवूडकरांचं फेव्हरिट डेस्टिनेशन ठरतंय.
आता अभिनेता विवेक ओबेरॉय मालदीवमध्ये कुटुंबियांसोबत धमाल करतोय.
लॉकडाऊनमुळे अनेक महिने घरात राहिल्यानंतर विवेक कुटुंबियांना घेऊन मालदीवला पोहोचला आहे.
या ट्रीपमध्ये त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी त्याच्यासोबत आहेत.
या ट्रीपचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो मुलांसोबत धमाल करताना दिसत आहे.
विवेक उत्तम अभिनेता तर आहेच, मात्र तो एक उत्तम फॅमिली मॅनही आहे.
त्याचे हे फोटो नक्कीच फॅमिली गोल्स देत आहेत.