सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी तुमचे लाडके कलाकार मस्त नवनवीन डेस्टिनेशनवर भटकंती करत आहेत.
त्यात अभिनेत्री कियारा आडवाणी पोहोचली आहे मालदीवमध्ये. अनलॉक झाल्यापासून अनेक कलाकारांनी मालदीवला हजेरी लावली होती. आता कियारासुद्धा मालदीवमध्ये धमाल करतेय.
कियारानं मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
कियारा मालदीवमध्ये धमाल करतेय तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रासुद्धा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतोय त्यामुळे हे दोघं सोबतच मालदीवमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
कियारा आडवाणी मालदीवमधील फोटो शेअर करत चाहत्यांना परफेक्ट ट्रॅव्हल गोल्स देत आहे.