अभिनेत्री दिशा पाटनी सध्या मालदीवमध्ये धमाल करतेय. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत अशात चित्रपटांचं शूटिंगही बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता तुमच्या लाडक्या कलाकारांना सुट्टी मिळालीये.
रविवारी सकाळी टायगर श्रॉफ आणि दिशाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. दोघंही मालदीवला रवाना झाल्याचं म्हटलं जात होतं. आता दिशानं मालदीवमधून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
नेहमीच हॉट अंदाजात दिसणाऱ्या दिशानं आतासुद्धा सुंदर हटके अंदाजात फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडतोय.
दिशा आणि टायगर सोबत मालदीवला गेले असल्याची चर्चा असली तरी दोघांनी सोबत फोटो शेअर केले नाहीये.
दिशा सलमान खानसोबत राधे या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती एक एक विलन रिटर्न्समध्ये दिसणार आहे.