अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणजेच मानसी नाईक आता बॉयफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
गेले अनेक दिवस मानसी तिच्या लग्नात कोणता लूक साकारणार याची चर्चा होती. आता मानसीच्या या लग्नाच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मानसीनं साकारलेला हा लूक जोधा अकबरमधील ऐश्वर्याचा लूक आहे. त्यामुळे या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
पिंक ब्रायडल लेहेंगा आणि अगदी जोधासारखी ज्वेलरी त्यामुळे मानसीच्या चाहत्यांना तिच्यात ऐश्वर्याचा भास झालाय.
लग्नात प्रदीपही एकदम हॅन्डसम दिसत होता. या दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.