ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर सर्व भारतीयांनी तिचे कौतुक केले होते. मनूने एक नाहीतर सरबजोत सिंहसोबत दुसरे कांस्यपदक जिंकले होते.
मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. अशातच मनूसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे.
मनू भाकर हिने गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी, जर मला संधी मिळाली तर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यासह काही वेळ घालावायला आवडेल असं म्हटलं होतं.
यामधील मनू भाकरची सचिन तेंडुलकरसोबत वेळ घालवण्याची इच्छा पूर्ण झाली. मनू भाकरने क्रिकेटचा दिग्गज सचिनसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मनू भाकर हिने सचिनची भेट घेतल्यावर, हा क्षण शेअर करताना मला खूप अभिमान वाटतो. तुमचा प्रवास आम्हाला आमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नेहमीच प्रेरित करत असल्याचं म्हणाली. मनू भाकरला सचिनने या भेटीवेळी गणेशाची मूर्ती दिली.