बॉलीवूडमध्ये 70-80 च्या दशकात आपल्या अभिनयाने माध्यमातून अभिनेत्री डिंपल कपाडियाने तिचे अधिराज्य गाजवले. लाखोंचा चाहत्यांच्या मनात आपली आवडती अभिनेत्री म्हणून तिने आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री डिंपल कपाडिया आज तिचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री डिंपलचा 8 जून 1957 रोजी मुंबईत जन्मलेल्या डिंपलला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. डिंपल कपाडियाने वयाच्या 16 व्या वर्षी फिल्ममेकर राज कपूर यांच्या 'बॉबी' (1973) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
डिंपलने आपल्या खासगी आयुष्यात तिच्या स्वतःहून 15 वर्षांनी मोठ्या राजेश खन्नासोबत लग्न केले आणि चित्रपटांपासून दूर राहिली.आश्चर्य म्हणजे डिंपल कपाडिया यांची राजेश खन्नासोबत पहिली भेट चित्रपटात दिसण्यापूर्वी झाली होती. दोघेही अहमदाबादच्या नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये भेटले होते.
70 च्या दशकात राजेश खन्ना नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. तिथे राजेश खन्ना यांना डिंपल खूप आवडली होती. तिथूनच दोघांच्या प्रेमकहाणी सुरू झाली.
डिंपलला चित्रपटात पुन्हा काम करायचे होते, पण राजेश खन्नाला त्याला विरोध होता. त्यामुळे या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही.त्यामुळे नऊ वर्षांनी दोघेही वेगळे झाले. यानंतर डिंपल राजेश खन्ना सोडून वडिलांच्या घरी मुलींसह राहू लागली.
राजेश खन्नापासून वेगळे झाल्यानंतर दोन वर्षांनी डिंपलने 'सागर' चित्रपटातून पुनरागमन केले आणि त्यानंतर पुन्हा ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली.
जेव्हा डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांच्यापासून वेगळे राहू लागली तेव्हा सनी देओलसोबत तिची जवळीक वाढू लागल्याच्या बातम्या आल्या. सनी देओल दोघे 11 वर्षे एकत्र होते.
डिंपलची इच्छा होती की सनीने तिच्याशी लग्न करावे, परंतु सनी आधीच विवाहित होता आणि त्याला आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता.
राजेश खन्ना यांच्यापासून 27 वर्षे विभक्त राहूनही डिंपल कपाडियाने त्यांना घटस्फोट दिला नसल्याचे म्हटले जाते. त्याच वेळी, डिंपल राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये राजेश खन्नाच्या सोबत राहिल्या.