करूणा, दारिद्रय, दैन्य, व्यसनाधिनता सारख्या रंगांनी ज्यांचे आयुष्य काळवंडलेले अशा सिग्नल शाळेच्या मुलांसोबत मराठी चित्रपट सृष्टींतील कलावंत, दिग्दर्शकांनी होळी साजरी करत त्यांच्या आयुष्यात रंग भरले.
ठाण्याच्या तीन हात नाका येथे भीक्षेकरी मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या शाळेत आज अनोखी अशी रंगपंचमी साजरी केली गेली सोबतच वाईट गुणांची होळी देखील शाळेच्या मुलांनी केली.
समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने ठाण्याच्या तीन हात नाका पुलाखाली सिग्नल शाळा नावाची शाळा गेली सात वर्षे भरवली जाते.
पुलाखाली एकेकाळी भीक मागत असलेली ५२ मुले या शाळेमुळे शिकती झाली. शाळेत अभ्यासासोबत विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून ही मुले मुख्य धारेच्या समाजासोबत जोडली जावीत म्हणून शाळेत सण उत्सव साजरे केले जातात.
यावेळी दिग्दर्शक वीजु माने, अभिनेते शेखर फडके यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंतांनी शाळेतील मुलांसोबत रंगपंचमी व होळी साजरी केली.
रंगाची उधळण व वाईट गुणांची होळी करत मुलांनी सर्वांसोबत आनंद साजरा करत आपल्या आयुष्यात नवे रंग भरण्याची संकल्प केला. रस्त्यावरील मूले हेच खरे या देशाचे रंग आहेत ते अधिक दिमाखदार व्हावेत यासाठी सगळींनी प्रयत्न करायला हवे एक कर्तव्य भावनेतुन आम्ही दरवर्षी या शाळेत रंगपंचमी साजरी करतो मुलांच्या चेहरयावरील आनंद हीच आमच्यासाठी पोचपावती असल्याची प्रतिक्रिया यावेळी वीजू माने यांनी दिली.