अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या सोशल मीडियावर तो काहीतरी वेगळं पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो.
आता सिद्धार्थनं नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
आपल्या उत्तम अभिनयासाठी आणि एनर्जीसाठी ओळखला जाणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव त्याच्या स्टाईलसाठीसुध्दा तितकाच चर्चेत असतो. अनेकदा स्टायलिश लुक्समधून तो चाहत्यांची मनं जिंकतो.
नुकतंच काही दिवसांपूर्वी सिद्धार्थनं महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात पाहुणा परिक्षक म्हणून हजेरी लावली होती.
व्हाईट पॅंट आणि स्टायलिश ब्ल्यू हुडी टीशर्टमधील सिध्दूचा हा लूक त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.